सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सव हर्षोल्हासात

bult

 

बुलडाणा प्रतिनिधी । जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे नुकताच राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.

त्यानिमित्त सकाळी जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव, वंशज लखोजीराजे जाधव, मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह मान्यवरांनी जिजाऊंना अभिवादन केले. या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमीची व जिजाऊप्रेमींची रीघ लागली होती. दरम्यान, या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार प्रतापराव जाधव, खासदार सुप्रिया सुळे यांचासह अनेक नेतेमंडळीही उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा विश्वभूषण पुरस्कार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांना देण्यात आला. तर कोण बनेगा करोडपती विजेत्या बबिता ताडे यांना मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण व जिजाऊ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Protected Content