मेहकर शहरावर पोलिसांची ड्रोनच्या सहाय्याने करडी नजर (व्हिडिओ)

मेहकर, अमोल सराफ । बुलढाणा जिल्ह्यात १०  में पासून कड़क लॉक डाउनला सुरुवात झाली आहे.. प्रत्येक तालुक्यात पोलीस व महसूल प्रशसन रस्त्यावर उतरून कार्य करीत आहे. मात्र तरीही काही हौसी नागरिक सहज बाहेर विनाकारण फिरत असल्याने पोलिसांनी कड़क भूमिका घेतली व आता विनाकारण बाहेर फिरणे बंद झाले आहे.

मेहकर शहरात कड़क बंदोबस्त ठेवण्यात आला असून सर्व पोलीस कर्मचारी दिवसरात्र सेवा देत आहे .. मात्र मोहल्ला , परिसर व गल्ली मध्ये  फिरणे  सुरुच होते. त्याने पोलिसांनी मेहेकर शहरात ड्रोन कॅमराच्या  सहाय्याने अशांवर करड़ी नजर ठेवायला सुरुवात केली आहे. मेहकर शहरात बाहेर खेडया पाड्यातुन येणाऱ्यांची चांगलीच वर्दळ  होती ती  बंद करण्यासाठी व मोहल्ला गल्लीमध्ये  फिरणारे यांच्यावर  ड्रोन कॅमराच्या माध्यमातून नजर ठेवत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता कोणताही नागरिक घराबाहेर पडताना दिसत नाही. परंतु,  मॉर्निंग वॉकला फिरण्याची संख्या जास्त असल्याकारणाने  वेगवेगळ्या तीन टीम तयार करण्यात आल्या. यामध्ये मेहकरचे तहसीलदार संजय गरकल, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान,  मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी मॉर्निंग वाकला फिरणार्‍याची चांगलीच परेड घेतली व कारवाईसुद्धा केली आहे. नियम पाळा अन्यथा गुन्हे दाखल करू असा दम सुद्धा देण्यात आला. अशा  मेहकर पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांच्या कड़क भूमिकेमुळे मेहकर तालुक्यातील कोरोना आटोक्यात येऊ शकते.

 

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1173580796413107

Protected Content