पाडळसे पोष्टात ऑनलाईन आयपीबीपी सेवा नसल्याने नागरीकांची गैरसोय

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज  प्रतिनिधी |  तालुक्यातील पाडळसे येथील पोष्टातर्फे मागील काही वर्षांपुर्वी इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बैंक अंतर्गत ग्रामस्थांचे व परीसारारातील नागरिकांचे खाते उघडण्यात आले आहे. परंतु, या ऑनलाईन सुविधेसाठी पाडळसे कार्यालयाला मोबाईल उपलब्ध करून देण्यात येत नसल्याने नागरिकांवर खाते बंद करण्याची वेळ आली असून त्वरित IPBP मोबाईल मिळावा अशी मागणी करण्यात येत आहे.

 

काही वर्षांपूर्वी पाडळसे पोष्ट कार्यालयात ऑनलाईन IPBP चे गावातील आणि  परिसरातील नागरीकांचे पोष्ट खाते उघडण्यात आले होते. परंतु मागील काही महिन्यांपासून IPBP चा  मोबाईल पाडळसे पोष्ट खात्याच्या पाडळसे कार्यालयाला न मिळाल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय निर्माण होवून पोस्टातील आपले खाते बंद करण्याची वेळ ग्रामस्थांवर आलेली आहेत. या संदर्भात नागरीकांच्या वतीने वेळोवेळी तक्रारी सुध्दा करण्यात आल्या असून देखील काही उपयोग झाल्याचे दिसुन नाही. तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ या कार्डाव्दारे लाभार्थी घेत असून आत्ता अशा प्रकारामुळे पोस्टाच्या बंद असलेल्या व्यवहारांमुळे नागरीकांच्या रोषाला पोष्ट मास्टरांना सामोरे जावे लागते आहे. तरी वरिष्ठ कार्यालयाकडून पाडळसे तालुका यावल येथील पोस्ट कार्यालयास त्वरीत IPBP मोबाईल मिळावा ही मागणी माजी सरपंच खेमचंद कोळी व आदी नागरीकांनी  केली आहे.

Protected Content