जेष्ठ शास्त्रीय गायक पं. शरद जांभेकर यांचे निधन

मुंबई : शास्त्रीय गायक पंडित शरद जांभेकर यांचे आज अल्पशा आजाराने लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ताप आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पंडित शरद जांभेकर यांनी अनेक संगीत नाटकांमध्ये कामे केली आहेत. संगीत सौभद्र नाटकातील राधाधर मधु मिलिंद हे त्यांचे नाट्यगीत विशेष गाजले. जांभेकर हे मुंबई आकाशवाणी केंद्रात दीर्घकाळ प्रोड्युसर होते. काही काळ त्यांनी सांगली आकाशवाणी केंद्रातही नोकरी केली. शास्त्रीय, सुगम, नाट्य या प्रकारांवर त्यांची विशेष पकड होती. जांभेकरांनी लता मंगेशकरांसोबत अनेक गाण्यांमध्ये कोरस म्हणून साथही दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

जळगावातही झाली होती मैफिल

जळगांव येथे प्रसिद्ध जेष्ठ शास्त्रीय गायक शरद जांभेकर यांची 30 जून 2002 रोजी मैफिल चांगलीच रंगली होती , ही मैफिल स्व.काकासाहेब गंधे सभागृहात झाली होती. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक दर्दीनी या संगीत मैफिलीत दंग झाले होते.

Protected Content