जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका भागात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखानावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकत ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळजनक उडाली आहे. ही कारवाई मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेत चोपडा मार्केट येथे रवाना केले. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता, त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले.
दरम्यान, या सर्व प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. शेवटची वृत्ते आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याच प्रकारचा अनैतिक व्यवसाय हा अनेक लॉजेसवर सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस निरिक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी ही कारवाई केली आहे.