रेल्वेतून उतरतांना तोल गेल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर येथील ५८ वर्षीय रोड व्यक्ती हे काशी एक्सप्रेसने जळगावी पेाहचले. काशी एक्सप्रेस थांबण्यापुर्वी त्यांचा फलाट नं.२ वर तोल जावून ते खाली कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्र.२ वर नेहमी प्रमाणे मंगळवारी 11 मार्च रोजी दुपारी बारा वाजता काशी एक्सप्रेस पोहचत असतांना रेल्वे बोगीत दारात उभे असलेला प्रौढ व्यक्ती अचानक तोल जावून खाली फेकला गेला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पेालिस उपनिरीक्षक अनिद्र नगराळे व सहकार्यांनी तत्काळ धाव घेत मृतदेह उचलून जिल्‍हारुग्णालयात दाखल केला. मयत वृद्धाच्या खिश्यात आढळून आलेल्या कागदपत्रावरुन मयत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली असून रविंद्र साहेबराव पाटिल (वय-५८, रा. शिवाजीनगर) असे त्यांचे नाव असल्याचे निष्पन्न होताच रेल्वे पेालिसांनी शिवाजीनगरातील त्यांच्या कुटूंबीयांना संपर्क करुन माहिती दिली. कुटूंबीयांनी जिल्‍हारुग्णालयात पोहचल्यावर मृत्युची माहिती कळाल्यावर एकच आक्रोश केला. रेल्वे पेालिसांत याप्रकरणी अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक अनिंद्र नगराळे करत आहेत.

Protected Content