पोलीस मुख्यालयात दिव्यांग बांधवासाठी कोविड लसीकरण व मास्कचे वितरण

जळगाव प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे दिव्यांग बांधवांसाठी लसीकरण आणि मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, के.के. कॅन्स् संचालक रजनीकांत कोठारी, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी, प्रभारी पोलीस अधिक्षक (गृह)चे दिलीप पाटील, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोउनि रविंद्र गिरासे, रा.पा.उपनिरीक्षक भरत चौधरी आदी उपस्थित होते. 

 

यावेळी ५० दिव्यांग बांधवांना लस देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहेकॉ अमित माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सहाय्यक फौजदार रावसाहेब गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश देसले, दीपक सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content