प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून चीनच्या लष्कराची माघार

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । वर्षभरापासून चीनची सेना बॉर्डरवर होती. पण, शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली आहे. त्याचा पुरावा भारतीय लष्करानं आज जारी केला आहे. चीनी सेना वादग्रस्त भागातून काढता पाय घेत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

 

चीनी रणगाडे माघारी फिरताना स्पष्ट दिसतं आहे. लडाखच्या फिंगर ८  भागातून चीनी परत फिरले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी संसदेत याबाबत माहिती दिली होती.

 

दोन्ही देशांचं सैन्य फॉरवर्ड भागातून माघारी जाणार असं संरक्षण मंत्री म्हणाले. चीनसोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्यातून दोन्ही देशांनी वाद मिटवून माघार घेण्यावर एकमत बनवलं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

 

 

 

 

पेंगॉंग लेक हा भारतासाठी महत्वाचा आहे. चीनी सैन्यानं ह्याच तळ्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात सैन्य वाढवलं होतं. आणि त्यातूनच दोन्ही देशात तणावपुर्व स्थिती निर्माण झाली. नऊ महिन्यांपासून ही तणावाची स्थिती आहे. आताच्या चीनच्या माघारीनं दोन्ही देशातला हा तणाव निवळण्याची चिन्हं आहेत.

 

भारत-चीन यांच्या सैन्यात  झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले

Protected Content