आ. मेवाणीसह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यास कारावास शिक्षा

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गुजरात मधील कॉंग्रेसचे आ. जिग्नेश मेवानी यांना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेश्मा पटेल या महिला पदाधिकारी यांना गुजरात मधील मेहसाना कोर्टाने तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गुजरात राज्यातील कॉंग्रेसचे आ. जिग्नेश मेवाणी यांचेसह राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी रेश्मा पटेल, सुबोध परमार यांनी सण २०१७ मध्ये आझादी कूच रॅली काढली होती. या रॅलीसाठी परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

यानुसार गुजरात मधील मेहसाणा येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी परमार यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. यात रॅली काढणे गुन्हा नाही, परंतु परवानगी शिवाय रॅली काढणे हा गुन्हा आहे. असे निरीक्षण नोंदवत कॉंग्रेस आ. जिग्नेश मेवाणी, राष्ट्रवादीच्या रेश्मा पटेल याच्यासह सुबोध परमार यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. तसेच या गुन्ह्यात या तिघांसह १२ जणाना दोषी ठरविण्यात आले आहे.

Protected Content