इंधनातील करांमुळे केंद्र सरकारची बल्ले बल्ले !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून केंद्र सरकारला मोठी कमाई होत असल्याचे अखेर केंद्र सरकारने मान्य केले आहे.

अबकारी कर, उपकर आणि अधिभार याप्रकारे इंधनविक्रीतून केंद्र सरकार चांगलीच कमाई करत असल्याचे खुद्द केंद्रानेच मान्य केले आहे. ६ मे २०२० पासून पेट्रोल दरात प्रतिलिटरमागे ३३ रुपये आणि डिझेल दरामागे ३२ रुपये केंद्राच्या तिजोरीमध्ये जमा होत आहेत”, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

ही कमाईची आकडेवारी अबकारी कर, उपकर आणि अधिभार या तिन्ही गोष्टी मिळून आहे. १ जानेवारी २०२० ते १३ मार्च २०२० दरम्यान केंद्र सरकार प्रति लिटर पेट्रोल मागे २० रुपये तर प्रति लिटर डिझेल मागे १६ रुपये महसूल कमावायचे. म्हणजेच १ जानेवारी २०२० च्या आकडेवारीशी तुलना केल्यास सध्या सरकारने प्रति लिटर पेट्रोल मागील कमाई १३ रुपयांनी तर प्रति लिटर डिझेल मागील कमाई १६ रुपयांनी वाढलीय.

२०२० साली मार्च आणि मे महिन्यादरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास या कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे २३ रुपये तर डिझेलमागे १९ रुपये महसूल म्हणून मिळायचे.

Protected Content