यावल येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांसह दुकानदारांवर दंडात्मक कारवाई (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । कोरोना रोखण्यासाठी जिल्हाभरात लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू केले आहे. यावल शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ९८ वाहनधारकांसह ५ व्यावसायिकांवर नगरपालिका व पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. 

शहरात पोलीस अधिकारी व नगरपरिषद यांनी आज सकाळ पासुनच संचारबंदीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाकाच सुरू केला आहे. यावल शहरातील बुऱ्हाणपुर अकलेश्वर राज्य मार्गाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावरील  बुरुज चौकात आज सकाळच्या अकरा वाजेच्या नंतर कोवीडच्या निर्बंध घातलेल्या नियमांचे पालन न करता अनावश्यक विनाकारण फिरणाऱ्या ९८ दुचाकी आणी चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करीत १९ हजार ३०० रुपये प्रमाणे दंड ठोठावला , तर शहरातील प्रमुख मार्गावरील अनुपम रेडीमेड स्टोअर्सवर १२ हजार रुपये, पाकीजा स्टोअर्स ८ हजार रुपये, रूपकला साडी सेन्टर १० हजार रुपये आणी मंगलमुर्तीवर ५ हजार रूपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली असुन त्यांची दुकाने सिल करण्यात येवुन असे एकुण ५४ हजार३०० रुपये असे एकुण ७४ हजार रुपये दंडात्मक कारवाईतुन वसुल करण्यात आले आहे.

नगरपरिषदच्या व्यापारी संकुलनातील अनस मोबाईल शॉपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फैजपुर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, पोलीस अमलदार सलीम शेख , निलेश वाघ , भुषण चव्हाण , असलम खान , सुशिल घुगे , ज्ञानेश्र्वर कोळी, गृहरक्षक दलाचे कर्मचारी  यांच्यासह यावल नगर परिषदचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदचे स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे, मुबिनशेख, रवी काटकर , संदीप पारधे , नितिन पारधे , रामदास घारू यांनी या संयुक्त कार्यवाहीत सहभाग घेतला.

Protected Content