निवडणुकांपुर्वी नवमतदार नोंदणी मोहीम राबवावी युवा काँग्रेसची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशात व राज्यात आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगाच्या वतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुण तरुणींच्या मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत असुन,  मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जनजागृती करून विविध ठिकाणी शिबीराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष फैजान शाह यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

यावल तालुक्यातील युवा काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यात निवडणुकांपूर्वी आयोगाच्या आदेशान्वये आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुण तरूणींसाठी मतदार नोंदणी सुरू करण्यात आली असून, या निमित्ताने महसुल प्रशासनाने विविध ठिकाणी मतदार नोंदणी शिबिर राबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.

पुढच्या वर्षी होणार असलेल्या  महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणूक होणार असुन, निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी जनतेला मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी आवश्यक काही अडी-अडचणी येऊ नये यासाठी यावल तालुक्यातील विविध शहरांमध्ये, गावांमध्ये मतदार नोंदणी साठी नोंदणी शिबिर राबविणे अत्यंत गरजे असून, संबंधित बिएलओ यांची तात्काळ मतदार नोंदणी व दुरुस्ती संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्ती करणे गरजेचे आहे .

अशी मागणी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल रावेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाह यांनी केली आहे. निवडणुकी दरम्यान जनतेला मतदार विषयी काही अडचणींना सामोरे जावे लागु शकते या विषयाची दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी आहे.

या मतदार नोंदणीच्या विषयी युवक काँग्रेसच्या वतीने जागृत राहून मतदार नोंदणीस सहभाग घेऊन जनतेने आपले कर्तव्य पार पाडावे  असे आवाहन फैजान शाह यांनी केले आहे.

Protected Content