अरे बापरे…देशभरात एका दिवसात चार लाखांपेक्षा कोरोना रूग्ण !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशात कोरोनाचा प्रकोप कमी होण्यास तयार नसून काल दिवसभरात देशामध्ये तब्बल चार लाख १ हजार रूग्ण आढळून आली आहे. ही एकाच दिवसातील सर्वाधीक रूग्णसंख्या असल्याने आल्याने आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे.

शात पहिल्यांदा एकाच दिवसात कोरोनाचे ४ लाखाहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४ लाख १ हजार ९९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर ३ हजार ५२३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार ९८८ इतकी आहे.

५ एप्रिलला देशात पहिल्यांदा कोरोनाचे एक लाख रुग्ण आढळले. त्यानंतर १५ एप्रिलला देशात प्रथमच २ लाख रुग्णांची नोंद झाली. २२ एप्रिलला देशात पहिल्यांदाच ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. यानंतर आज म्हणजेच १ मे रोजी देशात ४ लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.