भरूच येथे कोविड केअर सेंटरला आग; १६ रूग्णांचा मृत्यू

भरूच वृत्तसंस्था । गुजरातमधील भरूच शहरातल्या पटेल वेल्फेअर संस्थेच्या कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीत १६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

भरुच येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री 12.30 च्या सुमारास आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, तर रुग्णालयातील इतर रुग्णांना जवळील रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे.

या कोविड केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये शॉटसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण आयसीयू वॉर्ड यात जळून खाक झाला. या आगीच्या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक रुग्ण हे गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Protected Content