विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २७व्या दीक्षांत समारंभास प्रारंभ झाला आहे.

या पदवीप्रदान समारंभात ३८ हजार ९१२ स्नातकांना पदव्या बहाल करण्यात येणार आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे १५ हजार ६३१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४ हजार ४६६ स्नातक, मानव्य विद्याशाखेचे १७ हजार ७८८ आणि आंत विद्याशाखेचे १ हजार ५७ स्नातकांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीतील ९० विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या समारंभात प्रत्यक्ष पदवी घेण्यासाठी २२ हजार ४१९ विद्यार्थ्यानी नोंदणी केली असून त्यामध्ये २५१ पीएच.डी.धारक विद्यार्थी आहेत.

अमेरिकेतील सुप्रसिद्ध भारतीय उद्योजक डॉ. मुकुंद करंजीकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ.करंजीकर हे टेक्नॉलॉजी होल्डिंग, एलएलसी सॉल्ट लेक सीटी येथे डायरेक्टर ऑफ इनोव्हेशन आहेत. यंदा पदवी प्रमाणपत्रावर विद्याशाखेचे नाव छापण्यात आले आहे. तसेच स्नातकाच्या आईचे नाव देखील प्रमाणपत्रावर आहे. प्रमाणपत्रावर क्यूआर कोड राहणार असून या कोडचा उपयोग मोबाइल अ‍ॅपद्वारे पदवी पडताळणीसाठी होणार आहे. या वर्षापासून प्रमाणपत्रावर विद्यापीठाचा होलोग्राम असणार आहे.

Add Comment

Protected Content