मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार कॉंग्रेस !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | एकीकडे भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाला व्यापक प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली असतांना कॉंग्रेसने हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून याला यंदा व्यापक प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तर कॉंग्रेस हाच दिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. बेरोजगारी दिवसाच्या अंतर्गत युवक कॉंग्रेसकडून देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येईल.

दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्याआधी दिलं होतं, याची आठवण युथ कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली. रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय, अशी टीका श्रीनिवास यांनी केली.

१७ सप्टेंबरला देशात युवा कॉंग्रेस राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करेल. ज्या व्यक्तीनं हम दो हमारे दोच्या अंतर्गत देशातील तरुणांना बेरोजगार केलं, त्यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्तानं राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करूया,असं आवाहन श्रीनिवास यांनी केलं आहे.

Protected Content