विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलीस प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी

अमळनेर प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमाचे पालन करुन मंडळांनी गणपती विसर्जन करावे. दरम्यान, अमळनेर पोलीस प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियम प्रमाणे नागरीकांनी व मंडळांनी गणेश विसर्जन करतांना खालील प्रमाणे काळजी घ्यावी –

१) सार्वजनिक गणपती व घरगुती गणपती मूर्ती संकलन केंद्रांवर जमा करावेत.

२) बोरी नदीच्या पात्राजवळ तिन्ही पुलांवर बंदोबस्त लावण्यात आला असुन सुरक्षेच्या व कोरोना संसर्गाचे अनुशंगाने तेथुन पुढे नागरीकांना मुर्ती विसर्जनासाठी नदीपात्रात जाण्यास मनाई केली आहे. त्याठिकाणी  स्वयंसेवक व विसर्जन करण्यासाठी नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून मुर्ती संकलित करून विधीवत विसर्जनाची उपाययोजना करण्यात आली आहे.

३) कोणीही व्यक्तिगत मोटरसायकलवर किंवा खाजगी वाहनावर विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेऊन जाणार नाही याची  नोंद घ्यावी.

४) याठिकाणी असतील मुर्ती संकलन केंद्र

१) वाडीचौक

२) पानखिडकी

३) बडगुजर मंगलकार्यालय

४) मराठा मंगलकार्यालय

५) आरके नगर गेट

६) ढेकूरोड फोर्ट

७) शिवाजी महाराज नाट्यगृह

८) बजरंग मंदीर-तांबापूरा

९) वाडीसंस्थान मंदिराजवळ

१०) बोरी नदीवरील तिन्ही पुल.

तरी सर्व गणेश भक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

 

Protected Content