गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | पोलिसांनी नाकाबंदीच्या दम्यान अवैधरित्या गोवंशाची वाहतूक करणार्‍या गुरांनी भरलेले वाहन जप्त केले असून चालक मात्र फरार झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, बुधवारी पोलिसांची नाकाबंदी असताना येथील छत्री चौकात फौजदार मोहन लोखंडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस नाईक किरण चाटे, बाळू भोई, हे तपासणी करीत असताना एक टाटा कंपनी चा छोटा हत्ती वाहनात चार गोवंश जातीचे चार गुरे त्यात दोन गाई व दोन वासरू अशी अवैधरित्या घेऊन जात असताना त्यांना आढळून आली.

दरम्यान, पोलिसांना पाहताच वाहनचालकाने वाहन सोडून धूम ठोकली पोलिसांनी सदरचे वाहन व त्यातील चारही गुरे ताब्यात घेतले. संबंधीत गुरे हे आमोदा येथील गोशाळेत सुरक्षितरित्या पोहोचवण्यात आली तर वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी वाहन चालक रईस खान हमीदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, हे.कॉ. उमेश चौधरी करीत आहेत.

Protected Content