देशवासियांनी कमावलेल्या ‘अर्थ’चा भाजपने अनर्थ केला- काँग्रेसची टीका

नवी दिल्ली । जीडीपीमध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वात जास्त घसरगुंडी झाल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. देशवासियांनी कमावलेल्या ‘अर्थ’चा भाजपने अनर्थ केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जनतेने कष्टाने कमावलेल्या अर्थचा भाजपाने अनर्थ केला, असल्याचा टोला लगावला आहे. तर काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या अगोदरपासूनच देशाच्या अर्थव्यवस्थेला संपविण्यात आलंय. असंघटीत क्षेत्रावर जाणीवपूर्वक अतिक्रमण करण्यात आलं. कारण, संघटीत क्षेत्रावर नियंत्रण ठेवणार्‍या मोदींच्या मित्रांना याचा लाभ व्हावा, यासाठीच असंघटीत क्षेत्रावर अतिक्रमण झाल्याचे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी म्हटलंय. तसेच, गेल्या कित्येक वर्षांपासून देशातील नागरिकांना कमावलेल्या पैशाची भाजपाने विल्हेवाट लावल्याचा आरोपही खेरा यांनी केला आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था २३.९ टक्क्यांनी घसरली आहे. आतापर्यंत झालेली अर्थव्यवस्थेची ही सर्वात मोठी घसरण होय. देशाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

Protected Content