बोदवडमध्ये ‘द बर्नींग कार’चा थरार; वेळीच आग विझवल्याने टळला अनर्थ !

बोदवड प्रतिनिधी । साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या कारने अकस्मात पेट घेतल्याची घटना येथे आज घडली असून यातील चालकाने प्रसंगावधान राखत बाहेर पडल्याने अनर्थ टळला.

याबाबत वृत्त असे की, साळशिंगीकडून बोदवडकडे येणार्‍या मारूती ओमनी कंपनीच्या कारने शहरातील शारदा कॉलनीजवळ अचानक पेट घेतला. यातील चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवत बाहेर उडी घेतली. तर परिसरातील नागरिकांनी धाव घेत आज विझवली.

संबंधीत ओमनी कार ही गॅसवर चालणारी असल्याने आगीमुळे स्फोट झाला असता तर परिसरात हानी होण्याची शक्यता होती. तथापि, नागरिकांनी तातडीने आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

Protected Content