दोन कोटी ९० लाख महिला गुलामीचे जगणं जगतात

न्यूयॉर्क: वृत्तसंस्था । जगभरातील दोन कोटी ९० लाख महिला गुलामीचे जगणं जगत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बळजबरी श्रम करण्यास भाग पाडणे, इच्छेविरोधात विवाह, कर्ज देऊन बंदी करणे आदी प्रकार घडत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

महिला सशक्तीकरण, समान संधी याबाबत कितीही चर्चा होत असल्या तरी महिलांना दुय्यम स्थान, हीन वागणूक जगभरात दिली जात आहे. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे.

‘वॉक फ्री एंटी-सेल्वरी ऑर्गनायझेशन’चे सह-संस्थापक ग्रेस फॉरेस्ट यांनी सांगितले की, दर १३० महिला आणि मुली आधुनिक गुलामीचे जगण जगत आहेत. मानवी इतिहासात अन्य कोणत्याही काळापेक्षा सध्या गुलामीत राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या विकसित समाजात महिलांना सुरक्षित वातावरण असल्याचे म्हटले जाते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ग्रेस फॉरेस्ट यांनी सांगितले की, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आर्थिक अथवा स्वयं लाभासाठी शोषण करत असेल आणि कोणाच्याही स्वातंत्र्याला टप्प्याटप्प्याने संपुष्टात आणत असेल त्याला ‘वॉक फ्री एंटी-सेल्वरी ऑर्गनायझेशन’ आधुनिक गुलामी मानते. आधुनिक गुलामीत असणाऱ्या महिला, मुलींच्या संख्येचा अंदाज हा आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना यांच्या माहितीच्या आधारे काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

या अहवालानुसार, जवळपास ९९ टक्के महिलांविरोधात लैंगिक शोषण वाढले असल्याचे म्हटले आहे. बळजबरी विवाहातील पीडितांमधील ८४ टक्के आणि बळजबरी श्रम करण्यास भाग पाडणाऱ्या पीडितांमध्ये ५८ टक्के महिला आहेत. लॉकडाउनमध्ये महिलांविरोधात झालेले अत्याचाराबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे फॉरेस्ट यांनी सांगितले.

 

आधुनिक गुलामी संपुष्टात आणण्यासाठी एक जागतिक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून बालविवाह आणि बळजबरी विवाह संपुष्टात आणण्यासाठी आग्रह करण्यात येणार आहे. जगभरातील १३६ देशांमध्ये या प्रथांना गुन्हा समजला जात नाही. या मोहिमेतून बहुराष्ट्रीय कंपन्याकडून पारदर्शकतेचा आग्रह धरला जाणार आहे

Protected Content