पंचायत समिती अध्यक्ष दलित महिलेला अपमानास्पद वागणूक
बैठकीत खुर्ची न देता जमिनीवर बसवले

चेन्नई : वृत्तसंस्था । तमिळनाडूतील कुडलोर जिल्ह्यात थेरकू थित्ताई गावातील पंचायत समितीच्या महिला अध्यक्षांना बैठकीच्या वेळी जमिनीवर बसविण्यात आले; बाकी सर्व सदस्य मात्र खुर्चीवर बसले होते. हा प्रकार व्हायरल झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या सचिवांना निलंबित केले

महिला अध्यक्षांनी सांगितले, की केवळ जातीमुळे उपाध्यक्ष मला अपमानास्पद वागणूक देतात. त्यांनी मला जमिनीवर बसण्यास सांगितले. ध्वजारोहणदेखील मला करू दिले नाही. त्यांचे वडील ध्वजारोहण करतील, असे ते म्हणाले. मी सर्व सदस्यांना सहकार्य करत असूनही मला अशा पद्धतीने वागणूक दिली जात आहे.

दरम्यान, पंचायत समितीच्या उपाध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. तो सध्या फरारी आहे.

Protected Content