संजय राऊत यांना पुन्हा ईडीची कोठडी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कोठडीन असणारे खासदार संजय राऊत यांना आज पुन्हा वाढीव कोठडी मिळाली आहे.

खासदार संजय राऊत यांना पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी ३१ जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. रात्री उशीरा त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कोर्टाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

आज स्पेशल पीएमएल कोर्टाने संजय राऊतांच्या चौकशीसाठी अधिक वेळ मागत ईडीने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. यामुळे आता राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार अल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुनावणी दरम्यान संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत कोर्टाकडे तक्रार केली होती.

Protected Content