गुटखा, पानमसालाची वाहतूक करणारे वाहन पकडले

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील वाकोद ते औरंगाबाद रोडवरून बेकायदेशीररित्या सुगंधित पानमसाला, गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करत असलेले वाहन पोलीस जप्त केले आहे. वाहनातून लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोद ते औरंगाबाद रोडवर असलेल्या रस्त्यावरून मंगळवार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान,  पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ६८८१) यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री ९ वाजता रस्त्यावर छापा टाकून वाहन जप्त केले आहे.  दरम्यान पोलीस येत असल्याचे पाहून वाहनावरील चालक हा गाडी सोडून पसार झाला आहे. यासंदर्भात पोलिसांनी मालाने भरलेला वाहन जप्त केले आहे. पोहेकॉ ईश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकांविरोधात पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि अमोल गर्जे करीत आहे.

 

 

Protected Content