यावल तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

WhatsApp Image 2020 02 19 at 1.02.02 AM

यावल (प्रतिनिधी) हिन्दवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

 

यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीमधील तहसीलदार यांच्या दालनात आज सकाळी १० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमिताने तहसीलदार जितेन्द्र कुवर यावलचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, दिपक बाविस्कर, मराठा सेवा संघाचे सचिव संतोष पाटील, तहसीलचे कर्मचारी युनुस युसुफ रवान, रामलाल कोळी, हिरामण साळवे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तर तालुक्यातील कोरपावली येथे ग्रामपंचायतच्या कार्यालयात महाराजांच्या प्रतिमेस सरपंच जलील पटेल, ग्राम पंचायत सदस्य ईस्माईल तडवी, राजेन्द्र पाटील, महेबुब तडवी, भरत चौधरी, किसन तायडे, रमजान तडवी, तुळसीराम कोळंबे व कोरपावलीचे ग्रामस्थ या प्रसंगी उपास्थित होते.

 

 

 

Protected Content