आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगले होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

3soniya 20uddhav 20sharad

 

पुणे (वृत्तसंस्था) इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असे वाटतेय. मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगले होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर बोलत होते.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अजितदादा, इतके वर्ष आपण उगाच दूर होतो. आता आपण सर्व एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालावली असे वाटतेय. आता आम्ही एकत्र आलो असून जे काही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार हे माझे सरकार आहे. हे आपले सरकार आहे. ही भावना गोरगरीब आणि सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असही त्यांनी सांगितले. तसेच आज आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून याठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. ज्यावेळी देशावर हिरवं संकट आले होते, त्यावेळी त्याच्या चिंधड्या करण्याचे काम छत्रपतींनी केले. आमचे विचार भगवा आहे, आमच्या धमन्यात भगवा आहे.

Protected Content