पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाईची मागणी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । गेल्या महिन्यापासून मुक्ताईनगर तालुक्यात संततधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई तातडीने अदा करावी अशी मागणी मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदार प्रदीप झांबरे यांना निवेदन देवून केली आहे.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या  महिन्या भरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले असून त्यामुळे  पिकांची मुळे सडली आहेत. सर्व पिके पिवळी पडली असून उडीद, मुग, सोयाबीनला कोंब फुटले आहेत तर कपाशीवर लाल्या रोग पडल्याने कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या हाताशी आलेले पिक वाया गेले आहेत.  तहसीलदार यांनी महसुल, कृषी यंत्रणेला या नुकसानीचे सर्व्हे करण्याचे आदेश द्यावे, व शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकरी बांधवाना मदत मिळवून द्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.

याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जेष्ठ नेते सुधाकर पाटील, तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, सरचिटणीस रवींद्र दांडगे, सुनील काटे, किसान सेल तालुकाध्यक्ष साहेबराब पाटील, शहराध्यक्ष राजु माळी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, बाजार समिती संचालक कैलास पाटील, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापू ससाणे, प्रवीण पाटील, वसंता पाटील, योगेश काळे, कैलास कोळी, रवी पाटील, ललित पाटील, जितेंद्र पाटील, जगन्नाथ पाटील, ओमप्रकाश चौधरी, योगेश बगळे, अजय महाराज तळेले, सुनिल राठोड, धिरसिंग राठोड, शिवशंकर भोलाणकर, रवी सुरवाडे, भूषण पाटील, रितेश पाटील, इकबार तडवी, विनोद तडवी, गोपाळ पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, शांताराम पाटील, बंडू पाटील, संदिप तायडे उपस्थित होते.

Protected Content