सम्राट कॉलनीतील तरूणाला मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कामावरुन घराकडे परतत असलेल्या २० वर्षीय  तरुणाला काहीही कारण नसतांना चार ते पाच तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी  एमआयडीसी पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

पिंप्राळा येथील मनीष सुरेश सोनवणे वय २० रा. सम्राट कॉलनी या हा काही दिवसांपासून त्याचे सम्राट कॉलनीतील मेव्हणे चेतन लिहेलकर यांच्याकडे राहण्यासाठी आला आहे. दोघेही फुले मार्केटमध्ये कपडे विक्रीचे काम करतात. रविवारी सायंकाळी सम्राट कॉलनीकडे परतत असतांना  चार ते पाच जणांनी कुठलेही कारण नसतांना मनीष सोनवणे यास चापटा बुक्क्यांसह  लोखंडी कड्याने मारहाण केली.  मारहाणीत मनीषच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात जखमी मनीष याने दिलेल्या तक्रारीवरुन ललित दीक्षित,  गणेश सोनार, अविनाश राठोड व कृष्णा चव्हाण रा.जळगाव या चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनार हे करीत आहेत.

 

Protected Content