अकोल्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात ; पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू

अकोला (वृत्तसंस्था) अकोल्यात कार आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर आहेत.

 

हुसेन गुलाम हुसेन, साबीया हुसेन हबीब आणि हुसेन हबीब मोहम्मद हबीब अशी जखमींची नावे आहेत. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती मूर्तिजापूर रोडजवळील नागोली नागठाणा गावात हा भीषण अपघात झाला. अकोल्यातील नागठाणा फाट्याजवळ नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एमएच ०४- बीडब्ल्यू – ५२५९ क्रमांकाच्या होंडा सिटी कारला अमरावतीकडे जाणाऱ्या एम.एच.१५- एफ.व्ही-१४१३ क्रमाकांच्या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत कारमधील सर्व जण बाहेर फेकले गेले. त्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.

Protected Content