दोन विमानांच्या धडकेत पाच ठार

 

 

पॅरिस: वृत्तसंस्था । फ्रान्समध्ये दोन विमानांमध्ये झालेल्या धडकेत पाचजण ठार झाले आहेत. एका प्रवासी विमानाची धडक मायक्रोलाइट विमानासोबत झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी पश्चिम फ्रान्समध्ये घडली.

मायक्रोलाइट विमानात २ जण होते. हे विमान DA40 या प्रवासी विमानाला जाऊन धडकले. या प्रवासी विमानात तीन जण होते. मायक्रोलाइट विमान एका घराजवळ पडले. दुसरे प्रवासी विमान निवासी भागापासून दूर अंतरावर पडले असल्याची माहिती समोर आली.

मायक्रोलाइट विमानातील दोघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी जवळपास ५० अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी कोसळलेल्या विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या अपघातात ठार झालेल्यांची ओळख पटली नाही.

Protected Content