कोचीमधील अलिशान इमारती जमीनदोस्त

kochi

 

कोची वृत्तसंस्था । कोचीमधील समुद्र किनाऱ्यालगत बांधण्यात आलेल्या बेकायदा दोन इमारती अवघ्या काही मिनिटातच जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. सीआरझेडचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. इतकेच नाही तर जल आणि वायू क्षेत्रात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करून याठिकाणी दोन इमारती बांधण्यात आल्या होत्या त्या पाडण्याचे काम सुरु आहे. १९ मजल्यांची आणि ९० फ्लॅट असलेली एच-२ ओ होलीफेथ अपार्टमेंट आणि ७३ फ्लॅट असलेली अल्फो सेरीन इमारतीला पाडण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे पोलिस महानिरीक्षक विजय साखरे यांनी हा परिसर ‘अत्यंत धोकादायक’ असल्याने ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, कोची किनारपट्टी भागातील बेकायदा इमारतींना १३८ दिवसांमध्ये पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष मोहीमेचे वैशिष्ट्य म्हणजे पाडण्यात आलेल्या इमारतीच्या आसपासच्या परिसरात सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जमिनीवर, पाण्यात आणि वायू क्षेत्रामध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Protected Content