जळगावच्या कांदा व्यापाऱ्यास 35 लाखात फसवणूक करणाऱ्यास अटक

MIDC Crime news

जळगाव प्रतिनिधी । जळगावाच्या व्यापाऱ्याने कर्नाटक व केरळ राज्यात राहणाऱ्या व्यापारीला ३५ लाखाचा कांदा ६ ट्रकमध्ये विकला होता. मालाचे पैसे परत न केल्याने फसवणूक केली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील एकाला अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, व्यापारी शब्बीर अब्दुल्ला खान (वय-65) रा. शनिपेठ यांचे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व कमीशन एजंट यांच्याकडून कांदा, लसून खरेदी विक्री करण्याचे काम करतात. कांद्याची ऑर्डर देणारे परप्रांतीय मोहम्मद शफिक इस्माईल भिस्ती व त्याची पत्नी (पुर्ण नाव माहित नाही), मोहम्मद एजाज इस्माईल भिस्ती, हारूण रशिद, मोहम्मद ईशाद सर्व रा. आझाद नगर, भटकल, जि, कारवार (कर्नाटक) यांचे रबा ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. 2014 पासून सर्वांशी व्यवहार करणे सुरू होते. नोव्हेबर 2017 मध्ये मोहम्मद शफिक इस्माईल भिस्ती यांनी 10 ट्रक कांदा परदेशात पाठविण्यासाठी जळगावचे व्यापारी शब्बीर अब्दुल्ला खान यांच्याशी बोलून 10 ट्रक कांद्यांची ऑर्डर दिली. त्याप्रमाणे शब्बीर यांनी

अशी केली फसवणूक
25 नोव्हेंबर 2017 रोजी – 15 टन 582 किलो कांदा – 6 लाख 62 हजार 882 रूपये किंमतीचा, 27 नोव्हेंबर 2017 रोजी – 375 गोण्या – 9 लाख 82 हजार 4 रूपये किंमतीचा, 27 नोव्हेबर 2017 रोजी – 16 टन 136 किलो – 7 लाख 32 हजार 400 रूपये किंमतीचा, 28 नोव्हेंबर 2017 रोजी – 16 टन 201 किलो – 5 लाख 76 हजार 849 रूपये किंमतीचा, 29 नोव्हेंबर 2017 रोजी – 16 टन 300 किलो – 5 लाख 57 हजार 758 रूपये किंतमीचा असे एकुण 35 लाख 11 हजार 893 रूपये किंमतीचा माला वेगवेगळ्या ट्रकमध्ये पाठविला. मात्र त्यांना पाठविलेल्या मालाचा रक्कम न दिल्याने व्यापारी शब्बीर अब्दुल्ला खान यांच्या फिर्यादीवरून मोहम्मद शफिक इस्माईल भिस्ती व त्याची पत्नी (पुर्ण नाव माहित नाही), मोहम्मद एजाज इस्माईल भिस्ती, हारूण रशिद, मोहम्मद ईशाद सर्व रा. आझाद नगर, भटकल, जि, कारवार (कर्नाटक) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा पासून सर्व आरोपी फरार होतो.

यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी पथक तयार करून आरोपींना शोधण्यासाठी रवाना केले. पथकाने अचूक असा तपास करून भटकल जि.करवार येथील निर्जन अश्या डोंगराळ भागातून माहीती घेऊन एक आरोपी कर्नाटक राज्यातील भटकल जि.करवार येथील जंगलातून भटकल पोलीसांचे सहाय्याने ९ जानेवारी २०२० रोजी एका संशयित आरोपी मोहम्मद एजाज इस्माइल ताब्यात घेतले आहे. पथकात सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर, असिम तडवी, इम्रान सैय्यद यांनी कारवाई केली. त्यांच्या कारवाईमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतूक होत आहे.

Protected Content