भरधाव डंपरने तरूणाला उडविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव डंपरच्या धडकेत पायी जात असलेल्या ३५ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोनवद गावाजवळील विहीर फाट्यासमोर घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी ६ वाजता डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटू प्रकाश कोळी रा. निंभोरा ता. धरणगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, छोटू प्रकाश कोळी हा तरूण आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील निंभोरा येथे वास्तव्याला होता. बुधवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास छोटू कोळी हा सोनवद गावाजवळील विहीर फाट्याजवळून पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ३५०५) ने त्याल जोरदार धडक दिली.

या धडकेत छोटू कोळी याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात डंपर चालक सुभाष शेनफडू कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहे.

Protected Content