काँग्रेसने जाहीर केली चौथी यादी; महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे आली समोर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने २३ मार्च रोजी रात्री आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये १२ राज्यातील ४५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. यातील मध्यप्रदेशच्या १२, उत्तरप्रदेशच्या ९, महाराष्ट्राच्या ४, तामिळनाडूमधील ७, मणिपूर, राजस्थान, जम्मू कश्मीर, उत्तराखंड या राज्यातील प्रत्येकी २, अंदमान निकोबार, पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, छत्तीसगड या राज्यातील प्रत्येकी १ मतदारसंघातून काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर यूपी काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय उमेदवार असतील. बसपमधून काँग्रेसमध्ये आलेले खासदार दानिश अली यांना यूपीतील अमरोहामधून उमेदवार असतील. महाराष्ट्रात काँग्रेसची शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आघाडी आहे. यातील नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे, रामटेकमधून रश्मी बर्वे, गडचिरोली-चिमूरमधून नामदेव किरसान यांना तिकिट मिळाले.

Protected Content