डॉ.तडवी आणि तबरेज अन्सारीच्या दोषींना फाशी द्या ; जळगावात पीआरपीचे अर्धनग्न आंदोलन (व्हिडीओ)

e67257a9 a411 4f05 9028 94154672fd21

 

जळगाव (प्रतिनिधी) मुंबईच्या जेजे रुग्णालयात डॉ.पायल तडवीचा जातीवाचक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. झारखंडमध्ये तबरेज अन्सारीची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती. या दोघांच्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

 

या संदर्भात अधिक असे की, मुंबईच्या जेजे रुग्णालयात सहकारी डॉक्टरांनी केलेल्या जातीवाचक छळाला कंटाळून डॉ.पायल तडवीने आत्महत्या केली होती. तर दुसरीकडे झारखंडमध्ये तबरेज अन्सारीची मॉब लिंचिंगमध्ये हत्या झाली होती. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ पीआरपीचे महामंत्री जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. निवेदनात तबरेजच्या मारेकऱ्यांना जामीन मंजूर करू नये. त्याच्या परिवारातील सदस्याला सरकारी नौकरीसह १ करोड रुपये देण्यात यावे. तसेच डॉ.पायल तडवीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांचा समावेश होता. यावेळी पीआरपीचे महामंत्री जगनभाई सोनवणे यांच्या विविध संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content