माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया राजकारणात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी प्रत्येक राजकीय पक्ष करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अनेकांची इनकमिंग सुरू आहे. आता माजी हवाई दल प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भदौरिया यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

आरकेएस भदौरिया हे ३० सप्टेंबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत हवाई दल प्रमुख होते. ते देशाचे २३वे हवाईदल प्रमुख होते. भदौरिया हे मुळचे आग्रा जिल्हयातील बह तालुक्याचे रहिवासी आहे. आज भाजप लोकसभेच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करू शकते. त्यांना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून भाजप लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

 

Protected Content