‘या’ राज्यात भाजप उमेदवार देणार नाही

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष उत्तर पूर्व राज्य मणिपूर, मेघालय आणि नागालँडमध्ये लोकसभा निवडणूकीसाठी आपले उमेदवार देणार नाहीत. या राज्यातील प्रादेशिक पक्षांना पाठिंबा देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. या तीनही राज्यात १९ एप्रिलला लोकसभेच्या ५२ जागांवर मतदान होणार आहे. भाजपने मेघालयातील सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला लोकसभा निवडणूकीसाठी येथील शिलाँग आणि तूरा या दोन्ही जागांवर आपला उमेदवार जाहीर न करता पाठिंबा दिला आहे. मेघालयमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षामध्ये तिहेरी लढत होणार आहे.

मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपची स्थानिक पक्ष नागा पीपल्स फ्रंटसोबत युती आहे. येथे लोकसभेच्या २ जागा आहेत इनर मणिपूरची जागा भाजप तर आऊटर मणिपूरची जागा नागा पीपल्स फ्रंटला देण्यात आली आहे. मात्र भाजपने इनर मणिपूरसाठी उमेदवार घोषित केलेला नाही. मणिपूरमध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि भाजप-नागा पीपल्स फ्रंटसोबत तिहेरी लढत होणार आहे. नागालँडमध्ये लोकसभेची एकच जागा आहे. या जागेवर भाजप नॅशनलिस्ट डॅमोक्रटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी यांना पाठिंबा दिला आहे. हा पक्ष नागालँडमध्ये सत्तेत सुध्दा आहे.

मिझोराममध्ये लोकसभेची एकच जागा आहे. या जागेवर भाजपने आपला मित्रपक्ष मिझो नॅशनल फ्रंट यांना पाठिंबा दिला. त्यांनी आपले विद्यमान राज्यसभा सदस्य के वनलालवेना यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पण सध्या मिझोराम राज्यात लालदुहोमा यांचा झोरम पीपल्स मूव्हमेंट हा पक्ष सत्तेत आहे. त्यांनी अदयाप आपली भूमिका निश्चित केलेली नाही. काँग्रेसने राज्याचे माजी गृहसचिव लालबियाकजामा यांना उमेदवारी दिली आहे.

Protected Content