नियम सांगणाऱ्या मुंढेंनी नियम तोडले आणि गैरव्यवहार केला ; नागपूरच्या महापौरांचा आरोप

नागपूर (वृत्तसंस्था) स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रमुखाची (सीईओ) निवड करण्यासाठी 10 जुलैला बैठक होत आहे. त्यामुळे जर तुकाराम मुंढे यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रमुख पदावर निवड झाली नव्हती, तर त्यांनी कुठल्या अधिकाराने कंत्राटदाराला 18 कोटी रुपये दिले, असा प्रश्न महापौर संदीप जोशी यांनी आज (3 जुलै) घेतलेल्या पत्रकार परिषद उपस्थित केला. अगदी नियम सांगणाऱ्या मुंढे यांनी नियम तोडले. नियमाच्या बाहेर वागले आणि गैरव्यवहार केला, असा आरोपही महापौरांनी केला आहे.

 

महापौर संदीप जोशी यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंवर अनियमिततेचे आरोप केले. यावेळी त्यांनी निर्णय घेण्यात आला तेव्हा आयुक्तांकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कार्यभार नव्हता. त्यांनी याबाबतचे पुरावे देखील सादर केले. मुंढे यांनी प्रभार नसताना कंत्राटदारांना पैसे देऊन अनियमितता केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यासंदर्भात संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोप फेटाळून लावले असून कुठंही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.

Protected Content