पाचोरा महाविद्यालयात ‘स्व संरक्षण ही काळाची गरज’ मार्गदर्शन कॅम्पचा समारोप

पाचोरा प्रतिनिधी | येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात ‘स्व संरक्षण ही काळाची गरज’ या मोहिमेअंतर्गत आयोजित पहिला राज्यस्तरीय विंगचून मार्शल आर्ट सेमिनार कॅम्पचा समारोप सोहळा संपन्न झाला.

या कॅम्पच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष तथा विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर (पाटील), इंडिया विंगचून असोसिएशनचे सचिव रामेश्वर चायल, महाराष्ट्र विंगचून असोसिएशनच्या अध्यक्षा अश्विनी चायल, प्रा.एस.एम.पाटील (पर्यवेक्षक), प्रा.डॉ.सुनीता मांडोळे, शीतल मोरे, निशा निकुंभ,

यांच्यासह प्रा.एस.एस.पाटील, प्रा.बडगुजर, पाचोरा येथील क्रीडा संयोजक प्रा. गिरीश पाटील, सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे कार्याध्यक्ष रणजीत पाटील, सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे खजिनदार मधुसूदन पाटील, सेल्फ डिफेन्स कराटे असोसिएशनचे सचिव राजेंद्र पाटील, सेन्साई – प्रकाश निकुंभ, आकाश जवरे, भावडु जाधव, सेन्साई – प्रवीण पाटील आदींची उपस्थिती होती.

Protected Content