बाजार समितीची संरक्षक भिंत पाडल्याने व्यापारी असो.चा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा

WhatsApp Image 2019 06 08 at 7.33.26 PM

जळगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची भाजीपाला मार्केट ते धान्य मार्केट पर्यंतची सुमारे ३०० मीटर लांबीची कुंपण भिंत पाडण्याचा निर्णय घेऊन आज बाजार समितीच्या सभापतींनी सकाळी ६ वाजेपासून संपूर्ण भिंत पाडण्याचे काम केले. दरम्यान, विश्वासात न घेता भिंत पडल्याने व्यापारी असोसिएश‎नने सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.

 

भिंत पाडण्याचे काम नियमानुसार केल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी स्पष्ट केले तर भिंत पाडण्या अगोदर व्यापाऱयांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते जेणेकरून अनेक व्यापाऱयांचा धान्याचा माल हा उघड्यावर पडला नसता अशी व्यथा व्यापाऱ्यांनी मांडली. पाऊस आला तर रस्त्यावरील पाणी बाजार समितीत घुसून धान्य खराब होऊन नुकसान होण्याची भीती आहे. तसेच मालाची रात्री चोरी होण्याची शक्यता असल्याने व्यापारी असोसिएश‎नने सोमवार पासून बेमुदत बंद करण्याची घोषणा केली असून नियोजित कॉम्लेक्सच्या बांधकामाला विरोध दर्शविला आहे. यावर सभापती यांनी मार्केटची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्याची हमी दिली असून सर्व्हिस रस्ता झाल्यावर कुंपण भिंत बांधण्याचा निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे समाधान झाले नसून त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे . दरम्यान बाजार समिती आणखी कोणती पाऊले उचलणार याकडे लक्ष लागले आहे.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मनपाचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले होते . पत्रात नमूद केल्याप्रमाणे बाजार समितीच्या जागेच्या १५ मीटर अधिक बाहेर कुंपण भिंत असल्यामुळे आणि हि जागा राष्ट्रीय महामार्गाची असल्याने ती पाडण्यासंदर्भात मनपा आयुक्तांचे पत्र बाजार समितीला प्राप्त झाले . २०१८ च्या नाहरकत मध्ये नमूद केल्यानुसार १५ मीटर बाहेर हि भिंत आहे. त्यानुसार हि कारवाई झाल्याची प्रतिक्रिया सभापती कैलास चौधरी यांनी दिली असून व्यापार्याच्या हितासाठी तातडीच्या उपाययोजना करू असे त्यांनी व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. यावेळी संचालक सुनील महाजन, प्रभाकर पवार , अनिल भोळे , मनोहर पाटील, आडत व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब बेहडे , शशिकांत बियाणी, सुनील तापडिया अशोक राठी, दीपक महाजन संजय शहा आदी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांची तातडीची बैठक
आडत असोसिएशनची आज भिंत पाडल्यानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास बैठक घेऊन डगा काढण्यात यावा अन्यथा व्यापारी सोमवारपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला.

Add Comment

Protected Content