पंकज माध्यमिक विद्यालयाचा ९८.८४ % निकाल

result 222 20180420411

चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वी चा निकाल ९८.८४% लागला असून निकालाची परंपरा कायम राखत १२ विद्यार्थ्यांनी ९०% व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. ७५ % व त्यापेक्षा अधिक गुण घेणारे विदयार्थी ७२ आहेत.

 

एकूण १७३ पैकी १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.९०% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथमेश दिनकर पाटील (प्रथम) ९५.४०%, मानसी किरण पाटील (व्दितीय) ९४.८०%, तन्मय योगेंद्र अहिले (तृतीय) ९३.२०%, कल्याणी विजय सोनवणे व यश ललित भालेराव (चतुर्थ) ९३%, ओम संजय गोसावी (पाचवा) ९२.६०%, विश्वदिप किशोर कोळी व भावेश जगदिश चौधरी (सहावा) ९२.४०%, हर्षवर्धन चंद्रशेखर चौधरी (सातवा) ९१.४०%, कल्पेश चंद्रकांत महाजन (आठवा) ९१.२० %, चेतन विलास रजाळे (नववा) ९०.२०%, वेदांत गजानन पाटील (दहावा) ९०% वरील सर्व गुणवंतांसह यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थापक डाँ.एस.पी. बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले, भागवत भारंबे व सर्व संचालक मंडळाने, तसेच मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील, एम.व्ही. पाटील, प्रा.डाँ संभाजी देसाई, प्रा.मिलिंद पाटील, रेखा पाटील, निता पाटील, तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content