मंत्र्यांना वीज बिलात सवलत हा गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – दरेकर

मुंबई । सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे. हा सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये या महिन्यात राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या वीजबिलाबाबत माहिती विचारली होती. लोक निर्माण विभागातील दक्षिण उप-विभागाकडून मीळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये राज्यातील १५ मंत्र्यांना वीजबिलं पाठवण्यात आलेली नाहीत. अनिल गलगली यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. मंत्री धनजंय मुंडे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि इतर मंत्र्यांना मागील काही महिन्यापासून वीज बिल आले नसल्याची माहिती अधिकारातून समोर ही माहिती समोर आली आहे. 

अनिल गलगली यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मेपासून पाच मंत्र्यांनी विजेची बिले पाठविण्यात आलेली नाहीत. यामध्ये दादाजी भुसे, केसी पाडवी, अमित देशमुख, हसन मुश्रीफ आणि संजय राठौड यांची नावे आहेत. मागील महिन्यांपासून जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड़, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, अनिल परब, बाळासाहेब पाटील यांना विजेची बिलं पाठविण्यात आलेले नाहीत.

या प्रकारावर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की,  सर्वसामान्य ग्राहक वीज बिलाने त्रासलेला आहे, नोकर्‍या नाहीत, कंपन्या बंद होत आहेत, त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचना सामान्यासमोर आहेत. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे. हा सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. हे सरकार मोठ्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.

Protected Content