मुक्ताईनगरात क्षत्रिय मराठा संघातर्फे ‘ढोल बजाओ आंदोलन’

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षण स्थगित असेपर्यंत पोलीस भरती थांबवावी, लोकप्रतिनिधींनी मराठा समाज आरक्षणाचा पाठपुरावा करावा, असा विविध मागण्‍यानिमित्ताने क्षत्रिय मराठा संघातर्फे मुक्ताईनगर येथील लोकप्रतिनिधी खासदार व आमदार यांच्या घरासमोर ‘ढोल बजाव आंदोलन’ करण्यात आले असून खासदार रक्षाताई खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. 

या निवेदनात वृत्तविशेष असे की, सुप्रीम कोर्टात निर्देशानुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत मिळणारे आरक्षण स्थगित करण्यात आले असून मराठा समाजाचे यामध्ये अपरिमित नुकसान होणार आहे त्यामुळे आरक्षणाला स्थगिती असेपर्यंत कोणत्याही प्रकारे राजकीय नोकऱ्यांची भरती करू नये. त्यामुळे येऊ घातलेल्या पोलीस भरतीला आरक्षण मिळेपर्यंत थांबण्यात यावे असे निवेदन क्षत्रिय मराठा समाजातर्फे मुक्ताईनगर येथील खासदार आमदार यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले. व तिथे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळेस सर्व मराठा समाज उपस्थित होता.

खासदार रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे आणि या अनुषंगाने व लोकप्रतिनिधी म्हणून जी काही मदत लागेल तर मी त्यांच्या सोबतच आहे. केंद्राकडे जी मदत लागेल केंद्र सरकार ति करेलच आणि मी त्यासाठी प्रयत्नशील राहील. यासंदर्भात आम्हाला सुद्धा आमच्या पक्षाकडून कळविण्यात आलेला आहे की, विरोधी पक्षाची भूमिका सोडून समाजाला न्याय कसा मिळेल. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. यासंदर्भात त्यांनी चर्चा सुद्धा केलेली आहे. मी लोक प्रतिनिधी असल्यामुळे या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेस याला काही दुमत नाही आणि आम्ही मराठा समाजा सोबतच आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आज मराठा समाजामध्ये त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आंदोलन केला तो त्यांचा अधिकार आहेत. ज्या पद्धतीने आंदोलन करीत आहे. त्यांनी त्यांचा स्वागत करतो त्यांच्या जागी मी पण आंदोलन केले असते. आणि या आंदोलनात मी तुमच्या सोबतच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्व मराठा समाज बांधवांना आश्वासन दिले. त्यांचा हा मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांचा हा संदेश मुख्यमंत्री पर्यंत पोहचावा. त्यांना योग्य न्याय मिळविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. मागे मराठा समाजाचे आंदोलन करण्यात आली त्यात मी पण सक्रिय होतो आणि आज पण मी या आंदोलनात सक्रिय आहे मराठा आरक्षणाचा हा मुद्दा सुप्रीम खंडपीठात आहे. सुप्रीम कोर्टाचा आम्ही मान ठेवतो परंतु त्यामागे अपील आहे. आणि त्यातून न्याय मिळेल व मराठा समाजाला शंभर टक्केआरक्षण मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो हो आपला लोकप्रतिनिधी म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करेल.

ढोल बजाव आंदोलनाच्या वेळी उपस्थित जितेंद्र पाटील, प्रमोद सोनवणे, जगदिश पाटील, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अनंता वाघ, सरपंच शोक निकम, विजेंद्र पाटील, निवृत्ती ढोले, शैलेश वराडे, गजानन पाटिल, सुभाष बनिये, मारोती कर्हाळे, योगीराज ढोले, भुषण पाटिल, कोहनराव इंगळे, निळकंठ पाटिल, सुरज पाटिल, निलेश ठाकरे, यांच्यासहित असंख्य तरुण बोदवड – मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content