शिरसोली गावात दोन गटात हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात दोन गटात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटाता तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, हेमंत मुरलीधर बारी (वय-१८) हा तरूण जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात वास्तव्याला आहे. शुक्रवारी २८ जुलै रोजी रात्री १० वाजता हेमंत बारी हा त्याचा मित्र मयूर महाजन यांच्यासोबत गावातील बसस्थानक जवळील पानटपरी येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे वैभव बारी, विवेक बारी, मयूर किशोर बारी, सौरव सोनवणे सर्व रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांनी मारहाण करून तीक्ष्ण वस्तूने वार करून जखमी केले. ही घटना घडल्यानंतर जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी २९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता हेमंत बारी याने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

दुसऱ्या फिर्यादीत म्हटले आहे की, वैभव मोहन बारी (वय-२२) हा आपल्या लहान भाऊ विवेक आणि परिवारासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतो. २८ जुलै रोजी रात्री १० वाजता विवेक बारी याला काही जणांना मारहाण केली होती. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मोठा भाऊ वैभव बारी आणि विवेक बारी यांला गावातील कुणाल बारी, हेमंत बारी, भोला बारी आणि मयूर महाजन यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत धरदार वस्तूने वार करून जखमी केले. यात वैभव बारी यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी वैभव बारी याने दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी २९ जुलै रोजी पहाटे ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.

Protected Content