नाश्ताच्या गाडीवरुन लांबविला तरुणाचा मोबाईल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाश्त्याच्या गाडीवरुन तरुणाचा मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील ईमरान शेख शङ्गी (वय-३०) हे मार्केटिंगचा व्यवसाय करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ओप्पो कंपनीचा मोबाल असून ते  २२ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव जाण्यासाठी ते जळगाव रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी याठिकाणी आपली दुचाकी लावून ते नाश्ता करण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आले. नाश्त्याच्या गाडीवर गर्दी असल्याने त्यांनी नाश्ता घेवून ते बाजूला आले. नाश्ता झाल्यानंतर पेसे देण्यासाठी त्यांनी शर्टच्या खिशात पैसे देण्यासाठी हात टाकला असता, त्यांना खिशात मोबाईल आढळून आला नाही. यावेळी नाश्ता करतांना कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल लांबविल्याचे त्यांना समजले. त्यांनी तात्काळ शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content