जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद होवून हाणामारी झाली. ही घटना शुक्रवारी विसनजी नगरातील महालक्ष्मी स्वीट मार्टजवळ घडली. याप्रकरणी दोघ तरुणांविरुद्ध परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील विदगाव येथील यश संजय कोळी (वय २०) हा तरुण आणि संशयित अरबाज खान रा. धरणगाव हे दोघ एकाच ठिकाणी कामाला आहेत. शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजेच्या दोन्ही कामवर असतांना “औषधांचा ट्रे व्यवस्थीत लाव” असे सांगितल्याचे वाईट वाटल्याने अरबाज खान याने यश कोळी याला शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी यश कोळी याने दिलेल्या तक्रारीवरुन अरबाज खान याच्यास इतर दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तर धरणगाव येथील अरबाज खान फिरोज खान याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित यश संजय कोळी व कुणाल संजय कोळी यांच्यासह एक जण असे तीन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देखमुख ह्या करीत आहे.