जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या कारला दुसऱ्या कारने धडक दिल्याने कारचे नुकसान केल्याची घटना शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दुसऱ्या कारवरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन राजेश चौधरी वय-२८, रा.अंबिका हाऊसिंग सोसायटी, जळगाव हा तरुण त्याची कार क्रमांक (एमएच १९ इए ८०२९) ने पुण्याकडे जाण्यासाठी शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता निघाला होता. जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातून जात असताना थांबलेल्या ट्रॅफिकमध्ये एका दुसऱ्या कार क्रमांक (एमएच १७ डीवाय ६६६८) वरील चालक मंगेश काशीराम मराठे रा. हरी विठ्ठल नगर] जळगाव याने चेतन चौधरी यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे चेतन यांच्या कारच्या डावी बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान या संदर्भात चेतन चौधरी यांनी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक मंगेश मराठे रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय मोरे करीत आहे.