यावल-भुसावळ मार्गावरील टेंभीपुलाजवळील झाडे-झुडपांमुळे नागरिक त्रस्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल-भुसावळ अत्यंत वाहनांची वर्दळ असणाऱ्या मार्गावरील निमगाव टेंभी पुला जवळीत झाडे झुडपी वाढल्याने धोकादायक अंधळ्या वळणावर येणारी वाहने दिसत नसल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ही गंभीर बाब लक्षात घेत त्वरीत झाडे-झुडपी काढावी अशी मागणी वाहनधारक व नागरिक करीत आहे.

यावल भुसावळ या वाहनांच्या वर्दळीच्या मार्गावरील निमगाव टेंभी गावाजवळच्या रस्त्यावर असलेल्या पुलाजवळच्या वळणावर वाहनासाठी अत्यंत धोकादायक वाटणारी मोठमोठी झाडे झुडपी वाढल्याने या वळणावर अवजड मोठमोठी वाहने कंटेनर, शाळकरी मुलाची वाहतूक करणारी स्कुल बसेस व गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांची वाहतुक करणारी रुग्णवाहिका व इतर वाहने समोरून येतांना दिसत नसल्याने या अंधळ्या वळणावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणची झाडे-झुडपी तात्काळ काढावी व होणारे भीषण अपघात टाळावे अशी मागणी वाहन धारकांकडून करण्यात येत आहे .

Protected Content