रायसोनी महाविद्यालयात ‘येस यू कॅन’ विषयावर मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात  ‘येस यू कॅन’ या विषयावर पोलीस उपअधिक्षक कुमार चिंथा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतांना त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,  ‘जिद्द व चिकाटीने स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवता येऊ शकते. सातत्य व परिश्रमाच्या बळावर यश खेचून आणता येते यासाठी प्रत्येकाने ‘वेळेचे नियोजन करा व ध्येयाचा जिद्दीने व चिकाटीने पाठपुरावा करावा,’ असे आवर्जून नमूद केले. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणेही दिली. ‘पोलीस विभाग सक्रिय करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी सहकार्य केले पाहिजे,’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी रायसोनी इस्टीट्यूटचे अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांचा सत्कार केला. डॉ. प्रणव चरखा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व रायसोनी इस्टीट्यूटच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाविदयालयाच्या अॅडमिशन डीन प्रा. प्रिया टेकवाणी यांनी केले. कार्यक्रमात सुमारे  २०० विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रायसोनी इस्टीट्यूटचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी अभिनंदन केले.

 

 

 

 

Protected Content