मुक्ताईनगरातून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याबाबत निवेदन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे तहसीलदार, उपअभियंता आणि पोलीस स्टेशनला शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणारी अवजड वाहतूक (सहा चाकांपेक्षा जास्त) थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत का.? असा प्रश्न मुक्ताईनगर काँग्रेस तर्फे उपस्थित केला आहे, आता स्कुल कॉलेज उघडण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणाऱ्या गर्दी मुळे लहान मुले ,वयोवृद्ध यांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे, ही धक्कादायक कर्कश करणारी वाहतूक सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी करून शहराबाहेरून वळवावी नाहीतर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही , शहरामध्ये जागोजागी लहान लहान मिडल स्पीडब्रेकर लावणे गरजेचे झाले आहे या मागण्या त्वरित मान्य न केल्यास मुक्ताईनगर काँग्रेस तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, असा विनंती वजा इशारा शहराध्यक्ष पवन खुरपडे यांनी दिला आहे..

याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष एस ए भोई, जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, जिल्हा सचिव संजय पाटील, माजी तालुकाध्यक्ष अँड.अरविंद गोसावी, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बी.डी गवई, तालुका उपाध्यक्ष अँड.राहुल पाटील,अ.जा.तालुकाध्यक्ष निलेश भालेराव, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, राजुभाऊ शर्मा, संजय चौधरी, राजू वानखेडे, निखिल चौधरी, शहर उपाध्यक्ष आरिफ रब्बानी, शिवाजी पाटील, रवी जयकर ,वसीम मान्सुरी, आनंदा कोळी, पवन कांडेलकर यांच्यासह आदी उपस्थितीत होते.

 

 

Protected Content